Mon, Jun 01, 2020 22:35
    ब्रेकिंग    होमपेज › National › 'सांगण्यास फार वाईट वाटते, पण निवडणूक आयोग भाजपला विकला गेला आहे'

'सांगण्यास फार वाईट वाटते, पण निवडणूक आयोग भाजपला विकला गेला आहे'

Published On: May 16 2019 2:22PM | Last Updated: May 16 2019 2:23PM
मथूरापूर (पश्चिम बंगाल) :  पुढारी ऑनलाईन

लोकसभा सर्वच टप्प्यामध्ये हिंसाचार उफाळून आला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचाराचा कळस झाला. या सर्व प्रकरणावरून निवडणूक आयोगावर सडकून टीका झाली. 

त्यामुळे काल निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच थेट 'ॲक्शन' घेत बंगालमध्ये प्रचाराचा एक दिवस कमी केला, पण त्या टायमिंगवरूनही आता घमासान माजले आहे. एकाबाजूने काँग्रेस, मायावती यांनी पंतप्रधान मोदींसह निवडणूक आयोगावर घणाघाती प्रहार केल्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही तोच कित्ता गिरवला. 

ममता यांनी मथुरापूर येथे झालेल्या रॅलीत निवडणूक आयोगावर वाग्बाण सोडत कडाडून हल्ला चढवला.  त्या म्हणाल्या,  काल (ता.१५) आम्हाला  भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर आम्ही सभा घेऊ शकत नाही. निवडणूक आयोग भाजपचा भाऊ आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष संस्था होती. आता ती संस्था भाजपला विकली गेल्याचे सर्व देश म्हणत आहे. 

मला असे बोलताना दु:ख वाटत आहे, पण माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही. असे बोलण्याने मला जेलमध्ये जावं लागले तरी मी तयार आहे, पण सत्य बोलण्यासठी घाबरत नाही.