होमपेज › National › श्रवणबेळगोळ महामस्तकाभिषेक सोहळ्यास राहुल गांधी उपस्थित राहणार

श्रवणबेळगोळ महामस्तकाभिषेक सोहळ्यास राहुल गांधी उपस्थित राहणार

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 2:14AM

बुकमार्क करा
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

 श्री क्षेत्र श्रवणबेळगोळ येथे 7 ते 25 फेबु्रवारी या कालावधीत होणार्‍या बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळ्यास हजर राहण्याचे आश्‍वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. शिष्टमंडळात कर्नाटकचे मंत्री ए. मन्जू, माजी केंद्रीय मंत्री प्रदीप आदित्य, महामस्तकाभिषेक राष्ट्रीय समितीचे सचिव सुरेश पाटील, महासचिव सतीश जैन, माजी पोलिस आयुक्‍त ए. के. जैन, राजेश खन्ना आदींचा समावेश होता. 
यापूर्वीच्या महामस्तकाभिषेक सोळ्यास पं. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आदी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्याचे यावेळी सुरेश पाटील यांनी राहुल गांधी यांना सांगितले. दर 12 वर्षांनी एकदा हा 

महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न होतो. गेल्या तीन वर्षांपासून प. पू. स्वस्तिश्री चारुकिर्ती भट्टारक स्वामींच्या नेतृत्वाखाली सोहळ्याची तयारी सुरु आहे. जैन समाजाचे देश-विदेशांतील सुमारे एक कोटी भाविक या सोहळ्यास हजर राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर सोहळ्यास उपस्थित राहू, असे आश्‍वासन राहुल गांधी यांनी दिले. या महोत्सवासाठी कर्नाटक सरकारने 175 कोटी रुपयांची मदत केली असून श्रवणबेळगोळ येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय प्राकृत विद्यापीठासाठी 20 कोटी रुपयांची मदत करण्यात आली असल्याचे मुन्जू यांनी सांगितले.