Sat, Aug 24, 2019 10:40होमपेज › National › पोलिसांकडून मिळणार तक्रारदारांना चहा

आता तक्रारदारांना पोलिस ठाण्यात चहाची सोय

Published On: Nov 08 2018 3:55PM | Last Updated: Nov 08 2018 3:52PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पोलिस ठाणे म्हटले की नजरेसमोर येते ती खाकी वर्दी. या खाकी वर्दीकडे कोणतीही तक्रार घेवून जायचे म्हटलं की सर्वसामान्य माणसाच्या जीवावरच येते. सामान्य माणसाच्या मनातील हीच भिती आणि गैरसमज दूर करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह अनोखी कल्पना राबविणार आहेत. पोलिस स्थानकांमध्ये तक्रार करण्यासाठी येणाऱ्यांचे चांगले आदरातिथ्य स्वागत करा, त्यांच्याशी विनम्रतेने वागा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. तसेच तक्रारकर्त्यांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात चहाचे स्टॉल लावण्याचे आदेश देखील दिले आहेत. 

दिल्लीत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाले आहे. लुटमार, चोरी, महिलांची छेडछाड, अत्याचार यासंह महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्वसामान्य माणूस यासंबंधी तक्रार करताना दहा वेळा विचार करतो. कारण पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास गेलो असता सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळे नागरिक तक्रार करण्यास पोलिस ठाण्यात फिरकत नाही. नागरिकांच्या मनातील हाच गैरसमज काढून टाकण्यासाठी आणि दिल्ली पोलिसांबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून तक्रारकर्त्यांना चांगली वागणूक द्या अशी सूचना राजनाथ सिंह यांनी केली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यात चहाचे स्टॉल लावायचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. दिल्लीतील गुन्हेगारी प्रमाण कमी करण्यासाठ केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत.