Fri, Aug 23, 2019 17:39होमपेज › National › राकेश आस्‍थानांची याचिका फेटाळली

राकेश आस्‍थानांची याचिका फेटाळली

Published On: Jan 11 2019 3:47PM | Last Updated: Jan 11 2019 3:58PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

केंद्र सरकारने सक्‍तीच्या रजेवर पाठविलेले सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना दिल्‍ली उच्च न्यायालयाने धक्‍का दिला आहे. अस्‍थाना यांच्या विरोधातील एफआयआर रद्द करण्यासाठी त्‍यांनी दाखल केलेली याचिका दिल्‍ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 

सीबीआयने एफआयआर नोंदविल्यानंतर अस्थाना यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नजीम वझिरी यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी दोन्हीकडील बाजू ऐकून घेवून निकाल राखून ठेवला होता. त्‍यावर सुनावणी करताना शुक्रवारी अस्थाना यांची याचिका फेटाळून लावली.

अस्‍थाना यांच्याविरोधात भष्‍ट्राचाराच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता आणि पालन करण्यात आल्‍याची माहिती सीबीआयचे तत्‍कालीन संचालक आलोक वर्मा यांनी सांगितले होते. 

दरम्यान, हैदराबादचे उद्योगपती सतीश सना यांनी अस्थानांवर लाच घेतल्‍याचा आरोप केल्‍यानंतर अस्‍थाना यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. अस्थाना यांनी दोन कोटी रुपयांची लाच घेतली होती, असा आरोप सनाने केला आहे.