Fri, Jan 24, 2020 04:53
    ब्रेकिंग    होमपेज › National › कर्नाटकात भाजपला धक्का; काँग्रेसच्या सौम्या रेड्डींचा विजय

कर्नाटकात काँग्रेसचा भाजपला आणखी एक धक्का

Published On: Jun 13 2018 1:38PM | Last Updated: Jun 13 2018 1:38PMबंगळुरू : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. जयनगर विधानसभेची पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांनी भाजपच्या बीएद प्रल्हाद यांना २ हजार ९०० मतांनी पराभूत केले आहे. सुरुवातीला मतमोजणीमध्ये भाजपने आघाडी घेतली होती. मात्र, शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये जोरदार मुसंडी मारत सौम्या रेड्डींनी विजय मिळवला.

जयनगरमधील विजयामुळे काँग्रेसच्या कर्नाटक विधानसभेतील संख्याबळ ८० झाले आहे. निवडणुकीत ७८ जागी विजय मिळवलेल्या काँग्रेसने यापूर्वी आरके नगर निवडणुकीतही विजय मिळवला आहे. जयनगर येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांची मुलगी सौम्या तर भाजपचे वियकुमार यांचा भाऊ बीएन प्रल्हाद यांच्यात लढत झाली.

भाजपचे उमेदवार बीएन विजयकुमार यांच्या निधनामुळे जयनगर मतदारसंघातील निवडणुक रद्द करण्यात आल होती. यासाठी ११ जूनला मतदान घेण्यात आले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २१६ बूथवर ५५ टक्के मतदान झाले.  कर्नाटक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेस आणि जेडीएसला यश आले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपला धक्का बसला आहे.