Mon, Jun 17, 2019 10:14होमपेज › National › सरन्यायाधीश गोगोई यांनी रद्द केल्या न्यायाधीशांच्या सुट्ट्या 

सरन्यायाधीश गोगोई यांनी रद्द केल्या न्यायाधीशांच्या सुट्ट्या 

Published On: Oct 12 2018 10:34AM | Last Updated: Oct 12 2018 10:34AMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

नुकतेच सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतलेल्या रंजन गोगोई यांनी न्यायाधीशांच्या सुट्टया रद्द केल्‍या आहेत. न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा बोजा कमी करण्यासाठी कामकाजांच्या दिवशी न्यायाधीशांना सुट्टी न देण्याचा निर्णय घेतला गोगोई यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘नो लीव्ह’ फॉर्म्यूला सुरु केला आहे. 

सध्या देशात तीन कोटींपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित असून न्यायव्यवस्थेत अडथळा ठरत आहेत. यामुळेच न्याय मिळवण्यासाठी रांगेत उभ्या लोकांना वाट पाहावी लागत आहे. त्‍यामुळे सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोगोई यांनी कामकाजाच्या दिवशी न्यायाधीशांना सुट्टी न घेण्याचे आदेश दिले आहेत. 

जस्टिस गोगोई यांनी ३ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीपदाची शपथ घेतली. शपथ घेताच त्‍यांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टमधील प्रलंबित करोडो प्रकरणांचे ओझे हलके करण्यासाठी पावलं उचलणार असल्याचे संकेत दिले होते. पद स्वीकारल्यानंतर आठवड्याभरात त्यांनी प्रत्येक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि दोन वरिष्ठ न्यायाधीशांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी तसेच जास्त काळ चालणाऱ्या प्रकऱणांवर तोडगा काढण्याची गरज असल्याचे म्हटले.

कोर्टाच्या कामकाजाच्या बाबतीत जे नियमित नाहीत, त्या न्यायमूर्तींना खटल्यांवरून हटवा, असे गोगोई यांनी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना सांगितले. तसेच जे कामकाजादरम्यान शिस्तीचे पालन करत नाहीत अशा न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालय स्वत: दखल घेईल असे आश्वासनही त्‍यांनी दिले आहे.