Fri, Mar 22, 2019 04:22
    ब्रेकिंग    होमपेज › National › स्मृती इराणींच्यासोबतही झाले होते गैरवर्तन

स्मृती इराणींच्यासोबतही झाले होते गैरवर्तन

Published On: Apr 17 2018 4:04PM | Last Updated: Apr 17 2018 4:04PMनवी दिल्लीः पुढारी ऑनलाईन

देशात महिला किती असुरक्षित आहेत याबाबत आता काही नवीन सांगण्याची गरज नाही. महिलांवर अत्याचार झाल्याची रोज नव-नवी प्रकरणे समोर येत आहेत. आता तर चक्क देशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्यासोबतही गैरवर्तन झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या 4 तरूणांनी स्मृती इराणींचा पाठलाग करून त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. याबाबत दिल्ली पोलिसांनी 4 जणांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या चौघांची नंतर जामिनावर सुटका झाली. 

दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून चाणक्यपुरी येथील आपल्या घरी परतत असताना इराणींच्या कारचा 4 जणांनी पाठलाग केला होता.    

Tags : Chargesheet, stalking, Smriti Irani, bjp