Sun, Jul 05, 2020 13:10होमपेज › National › नियंत्रण क्षेत्र वगळून इतर ठिकाणची हॉटेल, मॉल्स होणार सुरू : आरोग्य मंत्रालय

नियंत्रण क्षेत्र वगळून इतर ठिकाणची हॉटेल, मॉल्स होणार सुरू : आरोग्य मंत्रालय

Last Updated: Jun 04 2020 11:09PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देश लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर पडत आहे. परंतु, कोरोना संसर्गग्रस्तांचा आकडा दररोज वाढत आहे. असे असताना गुरुवारी संध्याकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी करीत राज्यांना दिशानिर्देश दिले आहेत. नवीन ‘एसओपी’नूसार कोरोना नियंत्रण क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळता इतर ठिकाणचे शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्ट्रारंट, धार्मिक स्थळे सुरू करण्यात येतील. मंदिरात प्रसाद तसेच तीर्थ वाटप तूर्त करता येणार नाही. हॉटेलमध्ये एकावेळी केवळ ५० टक्केच ग्राहकांना बसता येईल. ग्राहकांचे साहित्याचे निर्जुंतूकीकरण करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. ६५ अथवा त्याहून अधिक वय असलेल्या वरिष्ठ नागरिक, गर्भवती महिला, १० वर्षांहून कमी वयाचे मुले, मधुमेहग्रस्त तसेच इतर संबंधित आजारग्रस्तांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

हॉटेलमध्ये ग्राहकांना सामाजिक अंतर, चेह-यावर मास्क अथवा फेस शील्ड घालणे बंधनकारक राहील. अल्कोहोलयुक्त सॅनिटायजर ने २० सेंकदांपर्यंत अथवा सामान्य साबणाने किमान ६० सेकंदांपर्यंत हात धुण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. हॉटेलमध्ये येणा-यांना आरोग्य सेतु डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात येईल. कुठल्याही प्रकारचे लक्षणे नसलेल्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येईल. याचप्रकारे ​दिशानिर्देश शॉपिंग मॉल्ससंबंधी देण्यात आले आहे. जेवणाची होम डिलेव्हरी करणा-या कर्मचा-याची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल. धार्मिक स्थळांवर कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लंगर तसेच भंडारामध्ये सामाजिक अंतर पाळावे लागले. मंदिरात भजन, कीर्तन करण्यासह सामूहिक प्रार्थना करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. 

कार्यालयामंध्ये वरिष्ठ कर्मचा-यांना न बोलवण्याच्या सूचना 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कार्यालयासंबंधीही दिशानिर्देश जारी केले आहेत. चेह-यावर मास्क, सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमासह आरोग्य सेतु अँप डाऊनलोड करण्याची कर्मचा-यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच वरिष्ठ कर्मचारी, गर्भवती महिला तसेच वैद्यकीय उपचार करणार्या कर्मचार्यांना कार्यालयात न बोलवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शक्य असल्याने जास्तीत जास्त कामे घरून करण्याचा सल्ला सर्व विभाग, खासगी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.