Wed, Oct 16, 2019 10:44होमपेज › National › सीबीआय वि. सीबीआय : संचालक आलोक वर्मा CVC समोर हजर

सीबीआय वि. सीबीआय : वर्मा CVC समोर

Published On: Nov 09 2018 2:02PM | Last Updated: Nov 09 2018 2:02PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) आलोक वर्मा केंद्रीय दक्षता आयोगासमोर (सीव्हीसी) हजर राहत विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. सीव्हीसीचे आयुक्त  के.व्ही. चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलसमोर वर्मा यांनी बाजू मांडली. यावेळी टी. एम. भासिन आणि शरद कुमार यांचा सुद्धा पॅनेलमध्ये समावेश आहे. 

 

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती नवीन पटनाईक यांच्या निरीक्षणाखाली वर्मा यांची चौकशी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आज सीव्हीसीसमोर वर्मा हजर झाले तेव्हा ए.के. पटनाईक सुद्धा उपस्थित होते. 

सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी वकिल सोबत न घेता चौकशीसाठी सामोरे गेले. सीव्हीसीकडून चौकशीसाठी वर्मा यांना बुधवारी नोटीस पाठविण्यात आली. आलोक वर्मा जवळपास एक तास सीव्हीसीसमोर होते. वर्मा यांनी माध्यम प्रतिनिधींना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी लाच प्रकरणावरून आरोप केल्यानंतर वर्मा आणि अस्थाना यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत.

दोघांचा वाद विकोपाला गेल्यानंतर त्या वादामध्ये केंद्र सरकारने उडी घेतली आणि दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले. या सक्तीच्या रजेविरोधात वर्मान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.  २६ ऑक्टोबरला न्यायालयाने वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश सीव्हीसीला दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.