Wed, Feb 20, 2019 14:30होमपेज › National › धक्कादायक! भाकरी करपल्याने घटस्फोट; अमानुष वागणुकीने ‘तिचा’ मृत्यू

भाकरी करपल्याने घटस्फोट, छळ; ‘तिचा’ मृत्यू

Published On: Jul 13 2018 9:03AM | Last Updated: Jul 13 2018 9:05AMबरेली : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये पतीने केलेल्या छळामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केवळ भाकरी करपल्याच्या कारणावरुन पतीने तलाक दिला. एवढ्यावरच न थांबता पतीने तिला काही महिने एका खोलीत कोंडून ठेवले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.

बरेलीच्या पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, रजिया नावाच्या महिलेचा पति नईमकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता असा आरोप तिच्या बहिणीने केला आहे. सुरुवातीला तिला तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट दिला. त्यांनतर एक खोलीत डांबून उपाशी ठेवण्यात आले. जेव्हा ही गोष्ट रजियाच्या कुटुंबियांना समजली तेव्हा तची सुटका केली. त्यावेळी रजियाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही दिवसातच तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पंतप्रधान आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे ट्विटरवर तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा पोलिसांनी गंभीर दखल घेत हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून पति आणि सासरच्या लोकांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रजियाच्या बहिणीने याबाबत सांगितले की, तिने फक्त करपलेली भाकरी वाढली एवढीच तिची चूक झाली. यावर नाराज होत पती नईमने तिला तलाक दिला. तलाक दिल्यानंतर रजियाला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात तिला जेवणदेखील दिले जात नव्हते. यामुळेच तिचा मृत्यू झाला. असा आरोप रजियाच्या कुटुंबाने केला आहे.