Tue, Jan 22, 2019 07:40होमपेज › National › येडियुरप्पा फक्त एका दिवसाचे CM : काँग्रेस  

येडियुरप्पा फक्त एका दिवसाचे CM : काँग्रेस  

Published On: May 17 2018 5:29PM | Last Updated: May 17 2018 5:29PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कर्नाटकातील विधानसभेच्या निकालानंतर राज्यात स्थिर सरकार स्थापनेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भाजपच्या येडियुरप्पांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी त्यांना विधान भवनात बहुमत सिद्ध करता येणार नाही, असा विश्वास काँग्रेस-जेडीएसला आहे. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी ट्विटवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. येडियुरप्पा हे एका दिवसाचे मुख्यमंत्री आहेत. त्यातील त्यातीलही अर्धा कार्यकाळ संपला, असे ट्विट सुरजेवाल यांनी केले आहे. 

एकाबाजूला राजभवनात येडियुरप्पा मुख्यमंत्री यांची शपथ घेतली. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांच्या शपथविधीमध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर  काँग्रेस-जेडीएसला आता सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. भाजपचा डाव मोडण्याचे मनसुब्यांसाठी काँग्रेस नवी रणनिती आखत आहे. आपल्या पक्षातील आमदार फुटीर होऊ नयेत, याचीही ते खबरदारी घेत आहे. यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये एकत्रित ठेवले आहे. भाजपवर त्यांचाच डाव उलटण्याच्या प्रयत्नात असेलेल्या काँग्रेसचे तीन आमदार गायब असल्याची चर्चा देखील जोर धरत आहे.