Mon, Nov 18, 2019 03:53होमपेज › National › रामजन्मभूमी आंदोलनाचा पाया रचणारे लालकृष्ण अडवाणी म्हणतात..

रामजन्मभूमी आंदोलनाचा पाया रचणारे लालकृष्ण अडवाणी म्हणतात..

Last Updated: Nov 09 2019 7:53PM

लालकृष्ण अडवाणीनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात एका बाजूला १९९० मध्ये एका बाजूला मंडल आयोगाची चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला धार्मिक ध्रुवीकरणातून राजकीय जमीन मजबूत करण्यासाठी भाजपकडून सुरु झाले. भारतीय जनता पक्षाचे भीष्म पितामह आणि रामजन्मभूमी आंदोलनाचा पाया रचणारे लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. 

विशेष म्हणजे बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात अडवाणी सुद्धा आरोपी असून ते सध्या जामिनावर आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्वागत केले. माझ्यासाठी पूर्णत्वाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया अडवाणी यांनी दिली. अडवाणी यांना रामजन्मभूमी आंदोलनाचे जनक समजले जाते. 

ते पुढे म्हणाले, माझ्यासाठी हा पूर्णत्वाचा क्षण आहे. परमेश्वराने मला एका मोठ्या आंदोलनात सहभागी होण्याची संधी दिली. भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील ते मोठे आंदोलन होते. मला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोषमुक्त झाल्याचे वाटत आहे. राम मंदिराच्या निर्माणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पहिली वीट ठेवण्याच्या दिशेने मार्गक्रमण झाले आहे.