होमपेज › National › गांधीनगर : अमित शहांनी घेतली आघाडी

गांधीनगर : अमित शहांनी घेतली आघाडी

Published On: May 23 2019 9:40AM | Last Updated: May 23 2019 9:41AM
गांधीनगर (गुजरात) : पुढारी ऑनलाईन

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अमित शहा यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीतील मतमोजणीत ते १९ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सी. जे. छावडा निवडणूक रिंगणात आहे. मात्र ते पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. 

गांधीनगर हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र, अडवाणींना येथून उमेदवारी नाकारण्यात आली. आता अमित शहा यांनी येथून निवडणूक लढविली आहे. लालकृष्ण अडवाणी याआधी विक्रमी मताधिक्याने गांधीनगर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.