Sun, Mar 24, 2019 02:33होमपेज › National › सर्वाधिक जागा मिळूनही भाजपची अडचण; बहुमत मिळणार नाही!

सर्वाधिक जागा मिळूनही भाजपची अडचण; बहुमत मिळणार नाही!

Published On: Mar 13 2018 12:11PM | Last Updated: Mar 13 2018 12:11PMनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

राज्यसभेच्या 58 जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवार निश्चित करणे, अर्ज दाखल करण्याबाबत अनेक राजकीय खेळी पडद्यामागे सुरु आहेत. या निवडणुकीत भाजप राज्यसभेतील जागा वाढतील यासाठी प्रयत्न करत आहे. तर काँग्रेस 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता कशी मिळेल याची संधी शोधत आहे. 

दोन्ही पक्ष राज्यसभा निवडणुकीच्या बेरजेच्या राजकारणात गुंतले आहेत. त्यात उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. राज्यसभेच्या राज्यातील 10 जागांपैकी भाजपला 8 तर समाजवादी पक्षाला एक जागा निश्चित मिळणार आहे. पण भाजपने नववा उमेदवार दिल्याने 'सप' आणि 'बसप'च्या अचडणी वाढल्या आहेत. काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये बसपला पाठिंबा दिला आहे तर मध्य प्रदेशमध्ये बसपने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. 

राज्यसभेवर जास्तीजास्त जागा निवडूण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भापजला या निवडणुकीत फायदा होणार आहे. पण राज्यसभेत एनडीएला बहुमतापासून दुरच राहील. सध्या होणाऱ्या 58 पैकी 28 जागा भाजपला मिळणार आहेत. अनु आगा, अभिनेत्री रेखा आणि सचिन तेंडुलकर या राष्ट्रपतींकडून नियुक्त झालेल्या तीन खासदारांचा कार्यकाळ देखील संपणार आहे. त्यामुळे या 3 जागा देखील एनडीएला मिळतील. 

आता राज्यसभेतील परिस्थितीचा आढावा घेतल्यास सध्या सभागृहात 239 सदस्य आहेत. त्यापैकी एनडीएकडे 83 सदस्य आहेत. बहुमतासाठी 121 सदस्यांची गरज आहे. या निवडणुकीनंतर एनडीएचे संख्याबळ 100च्या जवळ म्हणजे 98 पर्यंत पोहोचेल. ही संख्या बहुमतापासून बरीच लांब आहे. याचाच दुसरा अर्थ मोदी सरकारला या कार्यकाळात राज्यसभेत बहुमत मिळणार नाही. त्यामुळे त्यांना महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी बीजेडी आणि अण्णाद्रमुक सारख्या पक्षांची मदत घ्यावी लागेल.