Fri, Jul 19, 2019 15:27होमपेज › National › भाजपची गोव्यात पर्रीकरांच्या रिप्लेसमेंटची चाचपणी 

भाजपची गोव्यात पर्रीकरांच्या रिप्लेसमेंटची चाचपणी 

Published On: Sep 14 2018 11:47PM | Last Updated: Sep 14 2018 11:47PMपणजी : पुढारी ऑनलाईन 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सारखी बिघडणारी प्रकृती आणि त्याचा गोव्यातील प्रशासनावर होत असलेला परिणाम लक्षात घेत भाजपने  पर्रीकरांच्या रिप्लेसमेंटची चाचपणी सुरु केल्याची सुत्रांची माहिती आहे. पर्रीकरांच्या पर्यायाची चाचपणी करण्यासाठी भाजपची एक टीम सोमवारी गोव्यात येण्याची शक्यता आहे. या टीममध्ये रामलाल आणि बी.एल. संतोष यांचा समावेश असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.

मनोहर पर्रीकर उपचारासाठी तीन महिने अमेरिकेत होते. त्याचबरोबर त्यांना ऑगस्टमध्ये तपासणसाठी पुन्हा अमेरिकेला जावे लागले होते. तेथून परत आल्यावर काही दिवासात प्रकृती खालवल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल केले होते. ऑगस्टमध्ये ते तीन वेळा  त्यांना अमेरिकेला  जावे लागले होते. यामुळे गोव्यातील कारभार बाधित होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. 

दरम्यान, खुद्द पर्रीकरांनीच अमित शहांना प्रकृतीमुळे गोव्याचे मुख्यमंत्रीपद साभाळण्यास असमर्थता दर्शवली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच केंद्रातील एक टीम पर्रीकरांनीच्या रिप्लेसमेंटची चाचपणी करण्यासाठी गोव्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.