Mon, Nov 18, 2019 03:53होमपेज › National › भाजपकडून 'राम' राजकारणाचे मार्ग बंद होतील : काँग्रेस 

भाजपकडून 'राम' राजकारणाचे मार्ग बंद होतील : काँग्रेस 

Last Updated: Nov 09 2019 2:19PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसने अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. काँग्रेस राम मंदिर बांधण्याच्या बाजूने असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. ते काँग्रेस मुख्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे श्रेय एखादा पक्ष, समूह अथवा व्यक्तीला दिले जाऊ शकत नाही. राजकीय पक्षांनी वेळोवेळी राजकारणासाठी या मुद्याचा वापर केला होता. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर यावरून राजकारण करण्याचे भाजपचे मार्ग बंद झाले आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. १९९३ मध्ये ही जमीन काँग्रेस सरकारने संपादन केली होती, असेही सुरजेवाला म्हणाले. 

आज सकाळी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यामध्ये राम मंदिर निर्मितीवर प्रस्ताव पारित करण्यात आला होता. प्रस्तावामध्ये सर्व संबंधित पक्षांनी आणि समुदायांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.