Mon, Nov 20, 2017 17:24होमपेज › National › पोलिस अधिकाऱ्याला महिला होमगार्डकडून मसाज(व्हिडिओ)

पोलिस अधिकाऱ्याला महिला होमगार्डकडून मसाज(व्हिडिओ)

Published On: Nov 14 2017 6:42PM | Last Updated: Nov 14 2017 6:42PM

बुकमार्क करा

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन 

महाराष्‍ट्रामध्ये गेल्‍या चार दिवसात विविध गुन्ह्यात १८ पोलिसांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्‍ट्रात एकच खळबळ उडवून दिली असतानाच हैदराबादमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची मुजोरी समोर आली आहे. तेलंगणमध्ये एक पोलिस अधिकारी पोलिस ठाण्यातच महिला होमगार्डकडून मसाज करुन घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्‍यानंतर यावर जोरदार टीका होत आहे. 

या व्हिडिओत महिला होमगार्ड खाकी साडीत दिसत आहे. तर, मसाज करून घेणारा पोलिस अधिकारी डोळे बंद करुन कॉटवर झोपलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मसाज करून घेण्याऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्‍यान, या व्हिडिओतील पोलिस अधिकारी कोण आहे, याची चौकशी केल्‍यानंतर तो गढवालमधील असिस्टंट सब इन्स्पेक्टर हसन असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिस अधिकारी घटनेची अधिक चौकशी करत आहेत.