Sun, Jul 05, 2020 12:45होमपेज › National › आरोग्य मंत्रालयानंतर संरक्षण मंत्रालयातही कोरोना एन्ट्री!

आरोग्य मंत्रालयानंतर संरक्षण मंत्रालयातही कोरोना एन्ट्री!

Last Updated: Jun 04 2020 12:12PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

कोरोनाचा संपूर्ण देशात सध्या कहर सुरू आहे. भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याची कारवाई सुरू केली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अजय कुमार यांच्यात कोरानाची लक्षणे दिसून आल्यानंतर रायसीना हिल्सच्या साऊथ ब्लॉकमधील मुख्यालयात कार्यरत किमान ३५ अधिकाऱ्यांना अलगीकरणात पाठविण्यात आले आहे.

वाचा : कोरोनाग्रस्तांचा देशातील विक्रम सुरुच; गेल्या २४ तासात पु्न्हा उच्चांकी वाढ

यासंदर्भात संरक्षण सचिवांकडून कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी कोणतेही अधिकृत व्यक्तव्य समोर आलेले नाही. तसेच संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. तसेच अजून अजय कुमार यांना कोणत्या हॉस्पीटलमध्ये दाखल केलेले आहे यांची माहिती मिळालेली नाही.  

वाचा : केंद्रीय आरोग्य मंत्रालयातही कोरोना घुसलाच!

याआधी राज्यसभा आणि लोकसभा सचिवालयातील तीन अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यांच्या संपर्कातील इतर अधिकाऱ्यांना होम क्वांरटाइन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कामाच्या ठिकाणी सॅनिटायझरने स्वच्छता केली आहे.