Tue, Jan 22, 2019 08:10होमपेज › National › कर्नाटकनंतर बिहार, गोव्यातही रंगणार राजकीय 'नौटंकी'चा खेळ

कर्नाटकनंतर बिहार, गोव्यातही रंगणार राजकीय 'नौटंकी'चा खेळ

Published On: May 17 2018 6:45PM | Last Updated: May 17 2018 6:12PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेची राजकीय नौटंकी सुरु असताना याचा दुसरा आणि तिसरा पार्ट आता बिहार आणि गोव्यातही रंगण्याचे संकेत मिळत आहेत. गोव्यात सर्वाधिक जागा मिळवल्याचा दावा करत काँग्रेस याठिकाणी सरकार स्थापनेचा दावा करु शकते. यासाठी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांच्यात चर्चा सुरु असून गोव्याच्या दिशेने काही दिग्गज मंडळी गोव्याच्या दिशेने कुच करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली आहेय काँग्रेसचे प्रभारी चेला कुमार यासंदर्भात गोव्याला रवाना होणार आहेत. ते  गोव्यातील इतर पक्षांच्या नेत्यांसोबत शुक्रवारी गोव्याच्या राज्यपालांना भेटणार असल्याचेही बोलले जात आहे. 

 

चेला कुमार म्हणाले की, गोव्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. कर्नाटमधील घटनाक्रमानुसार याठिकाणी राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करायला हवे होते. गोवा काँग्रेसचे नेता यतीश नाईक यांनीही गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचालीचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, 2017 च्या विधानसभेत काँग्रेसने गोव्यात सर्वाधिक 17 जागेवर विजय मिळवला होता. सर्वात मोठा पक्षाच्या नात्याने आम्हाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण मिळायला हवे होते. पण,  राज्यपालांनी 13 जागेवर विजय मिळालेल्या  भाजपाला आमंत्रित केले. कर्नाटकमध्ये याच्या उलट समीकरण पाहायला मिळाले, असे यतीश नाईक यांनी म्हटले आहे. 

Image may contain: 2 people, people smiling, text

गोव्याशिवाय बिहारमधील राजकारणातही नवीन वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी देखील राज्यपालांच्या भेटीची तयारी सुरु केली आहे. त्यांनी यांसदर्भात एक ट्विट केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडी सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे बिहारमध्ये आरजेडीला सरकार स्थापन्याची संधी मिळायला हवी होती, असा उल्लेख तेजस्वी यादव यांनी ट्विटमध्ये केला आहे. कर्नाटकमध्ये भाजपने निर्माण केलेल्या समीकरणावरुनच सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.