Sun, Nov 18, 2018 18:26होमपेज › National › आधार लिंकिंगची मुदत ३१ मार्चपर्यंत

आधार लिंकिंगची मुदत ३१ मार्चपर्यंत

Published On: Dec 07 2017 11:33AM | Last Updated: Dec 07 2017 11:39AM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आधार लिंक करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयात पॅनकार्ड, लायसन यांसह सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांना आधार लिंकींग सक्तीबाबतची सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड लिंक सक्ती केली होती. यासाठी आधार लिंक करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत दिली होती. आता ही मुदत वाढवणार असल्याचे केंद्र सरकारने  सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक करण्याची मुदत मात्र ६ फेब्रुवारीपर्यंतच असल्याचे ॲटर्नी जनरल के.के. वेणुगोपालराव यांनी सांगितले.


संबंधित बातम्या
आधारच्या मशिन दुरुस्त करण्यास केंद्राची परवानगी
गुडन्यूज: आधार-पॅन लिंक करण्यासाठी मुदतवाढ  
असे करा घरबसल्या मोबाईल-आधार लिंक