Mon, Dec 09, 2019 18:54होमपेज › National › वर्‍हाडाची गाडी कोसळली कालव्‍यात; २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता

वर्‍हाडाची गाडी कोसळली कालव्‍यात; २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता

Published On: Jun 20 2019 10:20AM | Last Updated: Jun 20 2019 10:25AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

उत्तर प्रदेशमधील लखनौमध्‍ये गुरुवारी सकाळी इंदिरा कालव्‍यात वर्‍हाडाला घेऊन जाणारी गाडी कोसळली. या अपघातात २२ लोकांना वाचवण्‍यात यश आले आहे. तर ७ मुलांचा आतापर्यंत काहीचा पत्ता लागलेला नाही.  त्‍यांनी शोधण्‍यासाठी एनडीआरएफचे जवान घटनास्‍थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरु आहे. 

मिळालेल्‍या माहितीनुसार, लखनौमधील नगराम येथील पटवा गावाजवळ हा अपघात घडला. एक गाडी लग्‍नसोहळ्‍यावरुन परत येत होती. यामध्‍ये २९ लोक होते.  गाडी अचानक कालव्‍यात कोसळली. यामधील २२ लोकांना वाचवण्‍यात आले. यामध्‍ये महिला आणि मुलांचा देखील समावेश होता. 

या अपघातातील सात मुलांचा आतापर्यंत शोध लागलेला नाही. ही मुले पाण्‍याचा प्रवाहात वाहून गेल्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे. एनडीआरएफच्‍या टीमकडून बचावकार्य सुरु आहे. हे अपघातातील लोक बाराबंकी येथील राहणारे आहेत. ही घटना गुरुवारी पहाटे तीनच्‍या सुमारास घडल्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.