नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ संसदेत त्यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे. सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षांचे नेते, संसद सदस्य उपस्थित होते.