Sun, Feb 24, 2019 02:38होमपेज › National › चिमुकल्याचा मृतदेह ३७ दिवस बेडमध्ये

चिमुकल्याचा मृतदेह ३७ दिवस बेडमध्ये

Published On: Feb 14 2018 1:58PM | Last Updated: Feb 14 2018 1:42PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दिल्लीतील उच्च रहाणीमानामुळे झालेल्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी एका तरुणाने सातवर्षांच्या चिमुकल्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी या खुनाचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे युपीएससीच्या लेखी परीक्षेत दोनवेळा पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांने हे कृत्य केले आहे. 

स्वरूप नगरमधील आरोपी अवधेशने शेजारी राहणाऱ्या आशिश सैनी याची हत्या करून त्याचा मृतदेह आपल्या बेडखाली ठेवला होता. या प्रकरणी अवधेशला अटक करण्यात आली आहे.     

अवधेशने सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह ३७ दिवस आपल्या रुममध्ये ठेवला होता. खून केल्याचे समजू नये, यासाठी तो उंदिर मारण्याचे औषध आणि परफ्युमच्या साहय्याने मृतदेहाची दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्यायचा. खून केल्यानंतर मृतदेह लपवण्याची ही आयडिया क्राईम सिरीयल पाहून सुचली, अशी कबुली आरोपीने दिली आहे. 

मृत मुलाची बहीण गुंजनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,  ७ जानेवारीला आशू दुपारपर्यंत अंगणात खेळ होता. साडेपाच वाजता अवधेश काका सायकल दाखवणार असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला, त्यानंतर तो घरी आलाच नाही.  कुटुंबीयांनी अवधेशच्या साथीनेच आशू हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. कुटुंबीयांनी कोणावरही संशय व्यक्त केला नसल्यामुळे पोलिसांना याप्रकरणाचा शोध घेणे मुश्किल झाले होते. यात अवधेश सीबीआयची ओळख सांगून आशूला शोधण्यासाठी खास प्रयत्न करू, असा धीर कुटुंबियांना देत होता.  

पोलिस तपासांत गांभीर्य नसल्याचा आरोप होत होता. कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वी अवधेशवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी मंगळवारी अवधेशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. कर्ज झाल्यामुळे आशूच्या कुटुंबीयांकडून २० लाखांची मागणी करणार होता. मृदेहाचे  विल्हेवाट लावून कटुंबीयांकडे पैसे मागणार असल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. युपीएससीची परीक्षा दोनवेळा पास झाल्याचे आरोपीने म्हटले आहे.

आरोपी अवधेश उत्तर प्रदेशमधील कुरवालीचा रहिवासी आहे. गेल्या सात वर्षांपासून तो दिल्लीत वास्तव्यास आहे. बेरोजगारी आणि दिल्लीतील रहाणीमानासाठी लागणाऱ्या खर्चाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले.