Sat, Jul 04, 2020 10:05होमपेज › National › देशात २४ तासांत ५०७ जणांचा कोरोनाने मृत्यू

देशात २४ तासांत ५०७ जणांचा कोरोनाने मृत्यू

Last Updated: Jul 01 2020 9:56AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशात देशात २४ तासांत १८ हजार ६५३ नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा एकूण आकडा ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहोचला आहे. अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ लाख २० हजार ११४ आहे. तर आतापर्यंत ३ लाख ४७ हजार ९७९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत १७ हजार ४०० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.   

जगभरात कोरोना बाधितांची संख्या १ कोटी ४ लाखांवर पोहोचली आहे. तर ५ लाख ९ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.