Fri, Oct 20, 2017 08:37होमपेज › National › महाराष्ट्रात २५ टक्के ‘बालिकावधू’ 

महाराष्ट्रात २५ टक्के ‘बालिकावधू’ 

Published On: Oct 12 2017 8:39PM | Last Updated: Oct 12 2017 8:36PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली: वृत्तसंस्था 

पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात बालविवाहची परिस्थिती गंभीर असून एकूण 24.9 टक्के मुलींचा विवाह बाल वयातच लावला जातो. यासंदर्भात पश्‍चिम बंगाल 40 टक्क्यांसह देशात आघाडीवर आहे, असे राष्ट्रीय कुटूंब आरोग्य पाहणीत समोर आले आहे. अल्पवयीन पत्नीसमवेत शरीरसंबंध हा बलात्कारच मानला जाईल असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यालयाने बुधवारी दिला होता. हा निकाल देतांना न्यायालयाने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी 2015-16 चा आधार घेतला होता.

पश्‍चिम बंगालमध्ये 40.7 टक्के इतके असून ग्रामीण भागात तर हे प्रमाण 47 टक्के इतके प्रचंड आहे. देशातल सर्वांत कमी म्हणजे 7.6 टक्के इतक प्रमाण पंजाबात असल्याचे या अहवालात म्हणले आहे. 18 वर्षांखालील मुलींच्या विवाह प्रमाणात 39 टक्क्यांसह बिहार तर 38 टक्क्यांसह झारखंड दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहे. राजधानी दिल्लीचा विचार करता येथे बालविवाहाचे प्रमाण गेल्या दहा वर्षात खूपच कमी झाले आहे. 2005-06 साली 22.7 टक्के असलेले हे प्रमाण 2015-16 साली 13 टक्क्यांवर आलो आहे. महाराष्ट्राच्या आधी राजस्थानचा नंबर लागतो. या ठिकाणी 35.4 टक्के तर गुजरातमध्येही हे प्रमाण 24.9 टक्के इतके आहे.