Sun, Mar 24, 2019 02:15होमपेज › National › १९व्या वर्षी ‘एम्स’मध्ये डॉक्टर; पोलिसांनी केली अटक

१९व्या वर्षी ‘एम्स’मध्ये डॉक्टर; तरुणाला अटक

Published On: Apr 17 2018 12:21PM | Last Updated: Apr 17 2018 12:21PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) रुग्णालयात गेल्या पाच महिन्यांपासून १९ वर्षीय तरुण तोतया डॉक्टर म्हणून फिरत होता. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी तरुण नेहमीच डॉक्टरचा कोट आणि स्टेथस्कोप घालून रुग्णालय परिसरात फिरताना दिसत होता असे म्हटले आहे. 

पोलिसांनी सांगितले की, तोतया डॉक्टर बनून ‘एम्स’च्या आवारात फिरणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. अदनान खुर्रम असे तरुणाचे नाव असून तो बिहार राज्यातील आहे.  रुग्णालयातील डॉक्टरांसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये तो भाग घ्यायचा.  काही डॉक्टर्सना शंका आल्यानंतर त्याला पकडण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी काही प्रश्न विचारताच तो गडबडून गेला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. २ हजार डॉक्टर असलेल्या रुगणालयात एकमेकांना ओळखणे कठीण आहे. याचाच अदनानने फायद घेतला. या काळात त्याला रुग्णालयातील औषधांची बरीचशी माहिती झाली होती. 

आपल्या नातेवाईकांना सुविधा उपल्बध करुन देण्यासाठी अदनान एम्समध्ये डॉक्टर बनून फिरत होता असे पोलिस चौकशीत समोर आले आहे. यापूर्वी त्याच्यवार कोणताही गुन्हा नोंद नाही. तोतया डॉक्टर बनून एम्समध्ये फिरल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औषधांचे ज्ञान आणि इतर माहितीने पोलिसही चक्रावले

अदनान हा कॉलेजचा विद्यार्थी आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो रुग्णालय परिसरात फिरत होता. या काळात त्याने औषधांबद्दलचे मिळवलेले ज्ञान पाहून पोलिसही चक्रावले. त्याने रुग्णालयातील अनेक विभाग आणि त्यांचे विभागप्रमुख यांची नावे अचुक सांगितली. त्याने आपणाला येथील डॉक्टरांसोबत राहून शिकायचे होते असे म्हटले आहे. मात्र सुरुवातीला नातेवाईकांना मदत करण्यासाठी येथे आल्याचे  त्याने म्हटले होते.