Mon, Jun 17, 2019 10:04होमपेज › National › अठरा हजार कोटींचा क्रिप्टोकरन्सीत घोटाळा

अठरा हजार कोटींचा क्रिप्टोकरन्सीत घोटाळा

Published On: Oct 12 2018 12:48AM | Last Updated: Oct 12 2018 12:19AMनवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

क्रिप्टोकरन्सीचे एक्स्चेंज आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हॅक करून 2018 मध्ये आतापर्यंत जवळपास 18 हजार कोटींचा (927 दशलक्ष डॉलर) घोटाळा करण्यात आल्याची धक्‍कादायक माहिती पुढे येत आहे. मागील वर्षीपेक्षा हॅकिंगचे हे प्रमाण 250 टक्के जास्त असल्याचा दावा अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी फर्म सायफर ट्रेसने केला आहे. 

हे हॅकर्स भारताबाहेर असून, ते भारतातून मनी लाँडरिंग करत आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवणारा कुठलाही मनी लाँडरिंग कायदा अस्तित्वात नाही. वरील 18 हजार कोटींच्या व्यवहारांमध्ये सायफर ट्रेसने नजर ठेवलेल्या अतिशय संशयास्पद व्यवहारांचाच समावेश आहे.

सरकारची क्रिप्टोकरन्सी?

2018 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यांमध्ये हॅकिंग एक्स्चेंजच्या माध्यमातून 92 कोटी 70 लाख डॉलर (सुमारे 68 अब्ज रुपये) मूल्याच्या व्हर्च्यूअल करन्सीची चोरी झाली होती. ही चोरी गेल्या वर्षीच्या तुलनेत 250 टक्क्यांनी अधिक होती. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नियुक्‍त केलेली समिती सरकारला स्वत:ची क्रिप्टोकरन्सी आणण्याचा सल्‍ला देण्याची शक्यता आहे.