Mon, Sep 16, 2019 05:30होमपेज › Nashik › नालासोपारा बॉम्ब प्रकरणी पितापुत्रांना अटक

नालासोपारा बॉम्ब प्रकरणी पितापुत्रांना अटक

Published On: Oct 25 2018 4:41PM | Last Updated: Oct 25 2018 4:41PMजळगाव : प्रतिनिधी 

रावेर तालुक्यातील चिनावल येथील शेख हमीद शेख इब्राहिम आणि त्याच्या मुलाला नाशिक येथे नालासोपारा प्रकरणात बुधवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आहे.  मात्र या दोघांचा नालासोपारा प्रकरणात नेमका काय संबंध याबाबत माहिती मिळू शकली नाही.

जिल्ह्यातील यावल तालुक्यातील टाकळी हे गाव पुन्हा एकदा राज्यात बॉम्बस्फोट प्रकरणी  चर्चेत आले होते. या गावातील तीन युवकांना एटीएसने अटक केली होती. यात साखळी येथील किरण निंबादास मराठे (वय ३०, रा.साकळी, ता.यावल) वासुदेव भगवान सूर्यवंशी आणि विजय उर्फ भैय्या उखर्डू लोधी यांना एटीएसने अटक केली होती. या तिघांचे मोबाईल कनेक्शन चिनावल येथील  पिता- पुत्राशी असल्याचा संशय आल्याने त्याना अटक केली आहे. त्यांनी वापरलेले मोबाईलचे सीम कार्ड दोघांच्या नावावर असल्याची माहिती मिळाली आहे.

इब्राहिम हे बांधकाम मजूर असून  मुलगा केळीचा व्यवसाय करतो. या दोघांच्या नावावर असलेल्या मोबाईल सीम कार्डवरुन नालासोपारा, पंढरपूर, सोलापूर, सुरत व गुजरात मध्ये संपर्क झाले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या दोघांच्याकडून स्थानिक यंत्रणेला मात्र कोणतीच माहिती मिळालेली नाही.