Sun, May 31, 2020 21:28होमपेज › Nashik › मालेगाव सातशे पार, १६ नवे पॉझिटिव्ह

मालेगाव सातशे पार, १६ नवे पॉझिटिव्ह

Last Updated: May 23 2020 10:31PM

file photoमालेगाव (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील कोरोना उद्रेकामुळे ग्रामीण भागही प्रभावित होऊ लागला आहे. परिणामी दाभाडी गावाची कोरोनामुक्ती औटघटकेची ठरली. शनिवारी दिवसभरात ९९ अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी १६ संशयितांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एका रुग्णाचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

तीन रुग्ण हे दाभाडी गाव शिवारातील तर, द्याने व रावळगाव एक-एक, सोयगावमध्ये तिघांना संक्रमण झाले आहे. उर्वरित नऊ रुग्ण मध्यवर्ती शहरातील रहिवासी आहेत. या रुग्णवाढीमुळे बाधितांचा आलेख ७००वर पोहोचला आहे. नवीन डिस्चार्ज पॉलिसी नुसार ५११ रुग्ण बरे मानून त्यांना सोडण्यात आले.