Wed, Feb 20, 2019 16:02होमपेज › Nashik › सतीश चिखलीकर लाच प्रकरण : फिर्यादीची फाईल गायब; गुन्‍हा दाखल  

सतीश चिखलीकर लाच प्रकरण : फिर्यादीची फाईल गायब; गुन्‍हा दाखल  

Published On: Jul 12 2018 12:13PM | Last Updated: Jul 12 2018 12:13PMनाशिक : प्रतिनिधी 

सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता सतीश चिखलीकर लाच प्रकरणातील मुळ फिर्यादीची फाईल गायब झाल्‍याने जिल्‍हा सत्र न्‍यायालयाकडून गुन्‍हा दाखल करण्‍याचे आदेश देण्‍यात आले होते. त्‍यानुसार, सतीश चिखलीकर विरोधात मुळ फिर्याद गहाळ करून बनावट फिर्याद ठेवलेल्या बद्दल सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मे २०१३ ला २२ हजार रूपयांची लाच घेताना चिखलीकर आणि जगदीश वाघ या दोघांना अटक करण्यात आली होती. दोघाकडे केलेल्या चौकशीत उपसम्पदा आढळून आली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, या दोषारोपपत्रातील मुळ फिर्याद गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रधान व जिल्हा सत्र न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात चिखलीकर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

न्यायालयीन कर्मचार्‍यांची चौकशी होणार

याप्रकरणी न्यायलयातील कर्मचार्‍यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. मुळ फिर्याद गहाळ कशी व कोठून झाली याचा शोध घेन्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. हे दोषारोपपत्र न्यायालयाचे ताब्‍यात असल्याने मुळ फिर्याद न्यायालयातूनच गहाळ करून बनावट फिर्याद ठेवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.