Mon, Sep 16, 2019 05:50होमपेज › Nashik › उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले 

उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पाच पिल्ले 

Published On: Jan 20 2019 5:56PM | Last Updated: Jan 20 2019 7:49PM
चेहेडी : प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्ययातील पळसे येथील गट नं ९६६ या भाऊसाहेब शामराव गायधनी यांच्या शेतात बिबट्याची पाच पिल्ले आढळली आहेत. यामुळे पळसे शिवारात मादी बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. 

मादी बिबट्याची पिल्ले गायधनी यांच्या शेतात असल्याचे समजल्यानंतर ही पिल्ले पाहण्यासाठी नागरिकांना गर्दी केली होती. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत या पिलांना ताब्यात घेतले. मात्र बिबट्याच्या सहवासाने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.