Fri, Sep 20, 2019 22:03होमपेज › Nashik › सिन्नर तालुक्यात सेलिब्रेटींसोबत हजारो जलमित्रांचे महाश्रमदान

सिन्नर तालुक्यात सेलिब्रेटींसोबत हजारो जलमित्रांचे महाश्रमदान

Published On: May 01 2019 1:15PM | Last Updated: May 01 2019 1:14PM
सिन्नर : प्रतिनिधी 

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील धोंडबार व वडझिरे येथे पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सेलिब्रेटींसोबत ४ ते ५ हजार जलमित्रांनी महाराष्ट्र दिनी आयोजित महाश्रमदानात सहभाग घेतला. या कार्यक्रमात सर्वाना मिळून श्रमदान केले आहे. 

धोंडबार येथील कार्यक्रमात चला हवा येऊ द्या फेम अभिनेता भारत गणेशपुरे व दिग्दर्शक रवि जाधव यांच्यासमवेत तर वडझिरे येथे फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दाते व अन्य कलाकारांसमवेत हजारो जलमित्रांनी श्रमदान केले. 

नाशिक, आहमदनगर, पुणे आणि मुंबई येथील जलमित्रांचा ही या कार्यक्रमात सहभाग मोठा होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा दोन्ही गावांमध्ये महाश्रमदान होणार आहे.