Sat, Aug 24, 2019 10:34होमपेज › Nashik › कुमारी मातेकडून बाळला जन्म, मातेची आत्‍महत्‍या 

कुमारी मातेकडून बाळला जन्म, मातेची आत्‍महत्‍या 

Published On: Dec 23 2017 9:21PM | Last Updated: Dec 23 2017 9:20PM

बुकमार्क करा

जळगाव बुद्रुक  (ता.नांदगाव नाशिक) : वार्ताहर

नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी जबरदस्तीने शाररीक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर कोवळ्या वयात मातृत्व लादले. म्हणून तिने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली. अज्ञात इसमावर बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नांदगाव पोलिसात दाखल झाला आहे.

मृत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पीडित मुलीचे वडील सावरगाव ते शेतमजुरी करून उपजीविका चालवतात. त्यांची पत्नी, तीन मुले व एक आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी असा परिवार आहे. दि १३ डिसेंबर रोजी वरील सर्वजण कामावरून रात्री नऊ वाजता घरी आले असता, पीडित मुलगी घरात बेशुद्धावस्थेत आढळून आली, व तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी मुलीस चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. उपचारा दरम्यान तिने बाळास जन्म दिला. मात्र, ते मृत आढळून आले.

रूग्‍णालयात दाखल केल्यानंतर सहा दिवसानंतर पीडित मुलीचा उपचारादरम्‍यान मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञातावर बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवारे करत आहेत.