होमपेज › Nashik › प्रियकराने मुलीच्या वडीलांचा कुर्‍हाडीचे घाव घालून केला खून 

प्रियकराने मुलीच्या वडीलांचा कुर्‍हाडीचे घाव घालून केला खून 

Published On: Apr 14 2019 2:10PM | Last Updated: Apr 14 2019 2:10PM
नांदगांव : प्रतिनिधी 

प्रियकराने प्रियसीच्या वडिलांच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून त्‍यांचा खून केला. तसेच प्रियसीच्या भावाला देखील हातावर कुर्‍हाडीने घाव घालुन गंभीर जखमी केले. यानंतर हा प्रियकर फरार झाला आहे. या घटनेमुळे मांडवड गावात तनावपुर्ण शांतता असून, पोलिस संशयीत आरोपीचा शोध घेत आहेत. माञ जो पर्यंत आरोपी ताब्यात घेत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे. यामुळे मांडवड गावात तनावपुर्ण शांतता आहे.

याबाबत सविस्तर वृत्‍त असे की, मृत वडीलांच्या मुलीने (प्रियसी)  दिलेल्या फिर्यादीत असे म्‍हटले आहे की, वडील रंजीत आहेर यांनी मला आणि प्रियकर नागेश पवारला फिरताना पाहिले होते. त्‍यामुळे वडील रंजीत आहेर यांनी मुलीला रागावले आणि याचा तू त्‍याच्यासोबत का फिरत होतीस म्‍हणत मुलीला रागावले. यावेळीच वडील रंजीत आहेर यांनी मुलीसमोरच प्रियकर नागेश पवार यास काठीने मारहान केली.

याचा राग अनावर झालेल्या नागेश पवार यांने त्याच्या जवळ आसलेल्या कुर्‍हाडीने रंजीत आहेर यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालुन त्यांचा खुन केला. या वेळी झालेल्या मारामारीत आहेर यांचा मुलागा तुशार हा देखील गंभीर जखमी झाला. ही घटणा दि १३/४/१९ रोजी राञी ८:४५ वा घडली. या घटनेची नोंद राञी उशीर पोलिस स्‍टेशनमध्ये दाखल झाली. या दरम्यान संशयीत आरोपीने अंधाराचा फायदा घेत मांडवड गावातून पळ काढला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.