Tue, Jul 07, 2020 21:22होमपेज › Nashik › #ElectionResults2019 : धुळ्यात सुभाष भामरेंची प्रतिष्‍ठा पणाला

धुळ्यात सुभाष भामरेंची प्रतिष्‍ठा पणाला

Published On: May 23 2019 8:04AM | Last Updated: May 23 2019 8:06AM
धुळे : पुढारी ऑनलाईन 

धुळ्यात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतल्या आहेत. धुळ्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या वतीने संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने आमदार कुणाल पाटील, लोकसंग्रामच्या वतीने आमदार अनिल गोटे, बहुजन वंचित आघाडीच्या वतीने अहमद नबी तर बसपा, सपाच्या वतीने डॉ. संजय अपरांती असे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत. त्‍यामुळे धुळ्यात सुभाष भामरेंना काँग्रेसचे कुणाल पाटील यांचे आव्हान पाहायला मिळत आहे. 

धुळे लोकसभा मतदारसंघातून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अमरिष पटेल यांचा पराभव केला होता. त्‍यामुळे आता सुभाष भामरे आणि कुणाल पाटील यांच्‍यापैकी धुळ्‍याचा गड कोण राखणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.