होमपेज › Nashik › #ElectionResults2019 : हिना गावित नंदुरबारवर पताका फडकवणार?

हिना गावित नंदुरबारवर पताका फडकवणार?

Published On: May 23 2019 7:49AM | Last Updated: May 23 2019 8:06AM
नंदुरबार : पुढारी ऑनलाईन 

आज लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल असल्‍याने दिग्‍गज नेत्‍यांसह नागरिकांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नाशिक, दिंडोरीसह धुळे, जळगाव, रावेर आणि नंदूरबार लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीला थोड्‍याच वेळात सुरू होणार आहे. आता नंदूरबारमध्‍ये काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

नंदूरबार या लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून अॅड. के. सी. पाडवी यांना उमेदवारी देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे हिना गावित आणि पाडवी यांच्‍यापैकी नंदूरबारचा गड कोण राखणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

मध्‍यंतरी, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉ. हिना गावितांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली होती. त्यामुळे याचा फटका भाजपला बसणार का? हे पाहण्‍याचे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे. 

२०१४ च्या लोकसभेच्‍या निवडणुकीत डॉ. हिना गावित यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा पराभव केला होता. नंदुरबार काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्‍यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्‍ये चुरस लढत येथे आहे. नंदूरबारच्‍या गडावर कोण पताका फडकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.