Wed, Jun 03, 2020 05:25होमपेज › Nashik › खडसेंनीच केली अंजली दमानियांविरोधात तक्रार दाखल

खडसेंनीच केली अंजली दमानियांविरोधात तक्रार दाखल

Published On: Jun 13 2018 3:12PM | Last Updated: Jun 13 2018 3:16PMजळगाव(जि. नाकिश) : प्रतिनिधी

आम आदमी पक्षाच्या नेत्‍या अंजली दमानिया यांच्याह सह ६ जणांवर नाशिकच्या  मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पब्लीक इटरेस्ट लिटीगेशन मध्ये 9.50 कोटी चेक हा खोटा असून हा चेक ज्या बँकेकडून देण्यात आला आहे ती बँक लिकविटेशन मध्ये असल्याने त्यांना एक हजार रूपयांच्या वरील चेकवर सह्या करता येत नव्हल्‍या .त्यामुळे हे सर्व चेक फेक असल्याने याबाबत जळगाव पोलिसांनी सुध्दा यापूर्वी अहवाला दिला असून ही मुक्ताईनगर पोलिस गुन्हा दाखल करीत नव्हते. त्यामुळे आ. एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर न्यायालयात 156(3) प्रमाणे खटला दाखल करून न्यायालयाने अंजली दमानिया, श्रीमती रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुर्‍हाडे, सदाशिव सुब्रमनियम, चारमैन फर्नस यांच्या विरूध्द मुक्ताईनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलतांना  खडे म्हणाले की, ‘‘मला मंत्रीमंडळातून बाहेर काढण्यासाठी व मला बदनाम करण्यासाठी त्यावेळेस एक महिन्यापासून वाहिन्यांवर याबद्दल बातम्या सुरू झाल्या होत्या. खडसे किती वाईट असून त्यांनी किती भष्ट्राचार केला आहे. याबद्दल बातम्या येत होत्या. याचाच एक भाग म्हणून क्रिमिनल पब्लीक इटरेस्ट लिटीगेशन क्रमांक 46/2016 अंजली दमानिया, श्रीमती रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुर्‍हाडे, सदाशिव सुब्रमनियम, चारमैन फर्नस यांनी गुन्हा दाखल केला होता. त्‍यांनी उच्च न्यायालयात दस्ताऐवज हजर सादर केले होते. त्यामध्ये चोपडा अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चोपडा खाते आहे असे भासवून अ‍ॅक्सिस बँक जळगाव यांच्या नावाने 9.50 कोटींचा चेक दाखविला आहे. मात्र 28 /10/2010 रोजी चेक नंबर 760596 हा चेक 9.50 कोटीचा दर्शवून ते खडसे यांना देण्यात यावा असे दर्शविण्यात आले. त्यावर चोपडा अर्बनचे श्री अत्तरदे व एस.आर वानखेडे यांच्या सह्या आहे. असे असले तरी तो चेक अ‍ॅट पार अ‍ॅट नाशिक असा लिहलेले आहे. मात्र, या चेकवर ज्या अधिकार्‍याच्या सह्या आहे. त्यांनी 1/10/2010 पासून राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यावेळेस ज्या अधिकार्‍याच्या सह्या आहेत ते चोपडा बँकेचे कर्मचारी नव्हते. त्यावेळेस चोपडा अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बध होते. या निर्बंधानुसार त्यांना 1 हजार रूपयांच्या वरच्या चेकवर सहया करण्याचे अधिकार नव्हते. त्यामुळे चोपडा अर्बंनने असा चेक दिलेला नसल्याचा दाखल दिला आहे.’’

 याबाबत तात्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक सुपेकर यानीं सुध्दा चौकशी केली होती. ते खोटे असल्याचे अहवालात म्हटले आहे. अंजली दमानिया यांच्या साथीदारांनी जे चेक व डी. डी बद्दल म्हटले आहे ते माझ्या खात्यावर टाकले गेले नाही आणि या दोन्ही बँकेमध्ये माझे खाते सुध्दा नाही आहे असे खडसे यांनी सांगितले.

 याबाबत मी जिल्हा पोलिस अधिक्षक व डिवायएसपी यांना गेल्या महिन्याभरापासून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. मात्र, सटिफाईड कॉपी नसल्याचे व इतर कारणे दाखवून गुन्हे दाखल करता येणार नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले. एस.पी व डिवायएसपी हे दबावाखाली असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सागितले. हा गुन्हा दाखल करण्यासाठी शेवटी या ६ जणांविरूध्द मुक्ताईनगर न्यायालयात धाव घेतली, शेवटी न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले की या ६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून तपास करावा या तपासाबद्दल न्यायालयाला माहिती द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अंजली दमानिया व त्यांच्या ईतर सहकार्‍यांनी बनावट कागदपत्रे तयार करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र केले आहे. तसेच त्यांच्या सहकारी आणि समाज सेविका कल्पना ईनामदार यांनी याचा गौप्यस्फोट केला आहे. तसा त्यांचा 164 प्रमाणे न्यायाधिशासमोर जबाब नोंद सुध्दा झाला आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र देवून चौकशीची मागणी केली आहे. मला बदनाम करून मंत्री मंडळातून बाहेर काढण्यासाठीचा एक डाव होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मी व माझ्या परिवाराने या खोट्या बदनामीचा आणि अपमान सहन केला आहे, त्याचा मी बदला घेईल. त्यांना सुध्दा चैनशिर बसू देणार नाही. त्यांनाही समाजसमोर नंगा करेन. यामागे एका मंत्र्याचा हात आहे. मी गेल्याने त्याचा फायदा होईल म्हणून हा डाव होता. असे एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

 माझ्या व माझ्या कुटुंबाची तीन वेळा अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो व इनकॅम ट्रॅक्स विभागाकडून सखोल चौकशी झाली. बारिक गोष्टीची चौकशी झाली मात्र, माझे उत्पन्न हे शेती शिवाय काही नसल्याचे उघड झाले. याचा मला व माझ्या कुटुबियांना खूप त्रास झाला आहे.