Wed, Jun 03, 2020 18:28होमपेज › Nashik › ... तर मला भर चौकात फाशी द्या : धनंजय मुंडे 

... तर मला भर चौकात फाशी द्या : धनंजय मुंडे 

Published On: Dec 06 2018 11:35PM | Last Updated: Dec 07 2018 10:51AM
धुळे : प्रतिनिधी 

भ्रष्टाचार मुक्तीची घोषणा देणाऱ्या भाजपच्या ९० हजार कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात १६ मंत्र्यांना हाकला. याबाबतचे पुरावे आपण दिले आहेत. पुरावे खोटे ठरल्यास कोणत्याही चौकात फाशी द्या, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

धुळ्यात प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत त्यांनी भाजपवर टीका केली. यावेळी संदीप बेडसे, किरण शिंदे, कैलास हजारे, रावण नवले, तुषार पाटील, जितू इखे, आणा कणसे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, भाजपने शेतकरी, कष्टकरी व जनतेची फसवणूक केली आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवले, पण जनतेचे अच्छे दिन आलेच नाहीत. दरवर्षी दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले पण रोजगार दिला नाही. देशात लोकशाही नसून ठोकशाही आहे. दिल्लीत संविधान जाळण्यात आले. हा राष्ट्रद्रोह आहे, पण यावर ठोस कारवाई झाली नाही असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.