Wed, Jun 03, 2020 17:05होमपेज › Nashik › कायद्याचे राज्य न मानणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगरणार : मुख्यमंत्री

कायद्याचे राज्य न मानणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगरणार : मुख्यमंत्री

Published On: Dec 06 2018 11:22PM | Last Updated: Dec 06 2018 11:22PM
धुळे : प्रतिनिधी

राज्यात शहरीकरण वाढल्याने नदी व नाले प्रदूषित झाले आहेत. पण नागपूर मध्ये या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तयार केला. यातून नागपूर महापालिकेला ८० कोटींचा फायदा होतो आहे. असे प्रकल्प राज्यात करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. राज्यात कायद्याचे राज्य न मानणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगरणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

धुळ्यात आज भाजपच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावळ, केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, यांच्यासह जळगाव व नाशिक येथील आमदार उपस्तीत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादी टक्केवारी घेत असल्याचा आरोप केला. धुळे शहराचा विकास राष्ट्रवादीने केला नाही. या शहराची दिशा आणि दशा बदलण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे. देशात शहरी करण वाढले आहे. त्यामुळे सांडपाणी नदी नाल्यांमध्ये सोडले जाते. यावर नागपूरमध्ये राज्यातील पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तयार केला. यातून मनपाला उत्पन्न मिळाले आहे. धुळ्यात देखील भुयारी गटार योजना करण्यात येणार आहे. धुळेकर जनता भाजपच्या उमेदवारांना विजयी करणार आहे पण मनपा मध्येगेल्यानंतर टक्केवारी घेतल्यास त्यांना घरी पाठवेल. धुळ्यात काही नेते गुंडागार्दी करतात. पण राज्यात कायद्याचे राज्य आहे. कायदा मोडणाऱ्यांवर बडगा वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीच्या नेत्यांना पराभव दिसत असल्याने ते ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा प्रचार करीत आहेत. निवडणूक आयोगाने अजून 10 निरीक्षक नेमून काटेकोरपणे प्रक्रिया राबवावी. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात पातळी सोडू नये. आपण विकासाचा नारा दिला पाहिजे. आम्ही झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या कुटुंबाला जागा देण्याचा निर्णय घेतला. या परिवाराला त्याच ठिकाणी हक्काचे घर दिले जाणार आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.