Sat, Aug 24, 2019 09:46होमपेज › Nashik › संतांचे मंदिर बांधण्यास राजकीय विरोध नको : छगन भुजबळ

संतांचे मंदिर बांधण्यास राजकीय विरोध नको : भुजबळ

Published On: Jun 18 2018 8:16PM | Last Updated: Jun 18 2018 8:16PMसातपूर : पुढारी ऑनलाईन

थोर संताचे मंदिर उभे करण्यात सूडबुद्धीने राजकीय अडचण निर्माण करण्याचे काहीच कारण नाही. कोणी राजकीय व्यक्ती विरोध करतच नाही. पण काहींना सवय असते. प्रत्येक ठिकाणी राजकारण काढायची त्यांना आपण काही करू शकत नाही. परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. सातपूर मधील श्रमिकनगर येथील संत सावतामाळी मंदिर बांधण्यात प्रभागातील राजकीय व्यक्तींनी अडथळे आणल्याच्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ बोलत होते.

सातपूरमधील श्रमिकनगर मध्ये संत सावता माळी महाराज व विठ्ठल रुक्‍मिणीचे नाशिक  शहरामधील सर्वात मोठे मंदिर समाज बांधवाच्या माध्यमातून बांधण्यात आले आहे. या मंदिरास भुजबळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. 

भुजबळ पुढे म्हणाले, मंदिर बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय परवानग्या घ्या. निधी गोळा करा. काही  गरज भासल्यास समाज बांधवाच्या पाठीशी सदैव असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मंदिराच्या बांधकामाचे कौतुक करीत पुढे त्यांनी पर्यटन मंत्री असताना केलेल्या कामाची उदाहरणे दिली. नाशिक जिल्ह्यात विविध  ठिकाणी मंदिराच्या बांधकामासाठी निधी देवून मोठी कामे उभी केली. १० ते १४ कोटी पर्यंत पर्यटन व शासकीय निधीतून कामे केली. मंदिर हे सर्व भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. त्यामाध्यमातून भाविक, समाज बांधव एकत्रित येतात. यातून मोठे समाधान मिळते, असे भुजबळ म्‍हणाले. 

यावेळी भुजबळ यांनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी नागरिक व समाजबांधवानी जे प्रयत्न केले त्याबद्दल मनोगत व्यक्त करतेवेळी शेवटी सर्वांचे आभार मानले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, मंदिराचे अध्यक्ष, श्रीराम मंडळ, सदाशिव माळी, परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होते.