Fri, Jan 24, 2020 17:37होमपेज › Nashik › एटीएममधील पावणे सहा लाखांची रोकड लांबविली

एटीएममधील पावणे सहा लाखांची रोकड लांबविली

Published On: Sep 11 2019 8:28AM | Last Updated: Sep 11 2019 8:28AM

file photoजळगाव : प्रतिनिधी

गोपनीय असलेल्या पासवर्डचा गैरवापर व एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याच्या नावाखाली शिव कॉलनीतील टाटा इंडीकॅश बँकेच्या एटीएममधून ५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तीन संशयित आरोपींना अटक झाली आहे.

शहरात इंडीकॅश बँकचे एटीएम शिव कॉलोनीत आहे. या बँकेचे एटीएम मशीन दुरुस्त करण्याच्या नावाखाली व गोपनीय असलेल्या पासवर्डचा गैरवापर करून एटीएममधील कॅश स्लॉट कॅसेटसह ५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविण्यात  आली. हा  प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. याची माहिती मिळताच कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र पांडुरंग जोंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

या तक्रारीवरून कंपनीचे कस्टोडीयन दिनेश प्रकाश पाटील (लक्ष्मी नगर), राहुल संजय पाटील (रा. खडके बु. ता. एरंडोल ) व मुकेश विलास शिंदे (रा. समता नगर) यांना रामानंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.