होमपेज › Nashik › ...म्हणून मी अनेकांना नकोसा : एकनाथ खडसे 

...म्हणून मी अनेकांना नकोसा : एकनाथ खडसे 

Published On: Sep 15 2018 10:25PM | Last Updated: Sep 15 2018 10:25PMजळगाव : पुढारी ऑनलाईन

जनतेचे प्रश्न परखडपणे मांडतो आणि प्रसंगी वादही घालतो, माझा स्वभाव कडक असल्याने मी अनेकांना नकोसा झालो आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. रावेर तालुक्यातील वाघोडमध्ये गण व बूथ प्रमुखांचा कार्यकर्ता मेळावा अयोजित केला होता.  यानिमित्ताने माजी मंत्री कार्यक्रमाला आले होते.

विरोधी पक्षनेता होते तेव्हा तत्काळ कामे होत होती  असेही खडसे म्हणाले. खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा तसेच केंद्र सरकारच्या योजनांचे व कामांचे तोंडभरून कौतुक करून जनतेने लाभ घेण्याचे अवाहन केले. यावेळी खासदार रक्षाताई खडसे, आ. हरिभाऊ जावळे, माजी खासदार गुणवंत सरोदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.