होमपेज › Nashik › मालेगावमध्ये अडीच कोटींचा मध्यसाठा जप्त

मालेगावमध्ये अडीच कोटींचा मध्यसाठा जप्त

Published On: Dec 25 2018 6:19PM | Last Updated: Dec 25 2018 6:19PM
मालेगाव : प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्कच्या मालेगाव विभागाने भारतीय बनावटीचा फक्त विदेशात निर्यात करण्यासाठी निर्मित केलेला मद्यसाठा बेकायदेशीरपणे बाजारात आणणार्‍या टोळीला पकडले आहे. या टोळीकडून कंटेनर, कारसह दोन कोटी ४५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर अवैध मद्यसाठा वाहतूक होणार असल्याची माहिती मालेगाव विभागाला मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक डी. के. मेंगाळ यांच्या पथकाने दि. 20 डिसेंबर रोजी मुंबई आग्रा महामार्गावर सापळा रचून वाके फाटा येथे इन्व्होका कार (एमएच 39 डी 183) ही कार पकडली होती. त्यामध्ये भारतीय बनावटीचे फक्त भारताबाहेर निर्यात करण्यासाठी असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला. 750 मिली क्षमतेच्या 102 बाटल्या असलेले साडे आठ बॉक्स (सहा लाख 64 हजार 750 रुपयांचा माल) जप्त केले होते. राज्याचा महसूल बुडवून बाजारत आणल्या जात असल्या प्रकरणी चालक सागर संजय जयस्वाल, नसीरूद्दीन समसुल हुदा शाह, अर्जुन संजय देवरे यांना अटक करण्यात आली.

तपासात हा मद्यसाठा नाशिक-पुणे महामार्गावरील टोल नाक्याजवळ एमएच 46 एआर 5253 या कंटेनरमधून चालकाच्या संगनमतातून काढण्यात आल्याचे निष्पण्ण झाले. त्यानुसार पथकाने तपासाची चक्रे फिरवत मुंबई-आग्रा महामार्गाच्या कडेला इगतपुरी तालुक्यातील रायगड नगर शिवारात बेवारस स्थितीत कंटेनर सापडला. चालक व त्याचा साथीदार फरार झाले आहेत. विभागीय भरारी पथकाने कंटेनरसह सुमारे अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex