Sun, Aug 18, 2019 06:03होमपेज › Nashik › रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पायी मोर्चा दुसऱ्या दिवशीही सुरूच 

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पायी मोर्चा दुसऱ्या दिवशीही सुरूच 

Published On: Feb 12 2019 3:11PM | Last Updated: Feb 12 2019 3:10PM
चांदवड : सुनील थोरे

राज्याभरातील आदिवासी विकास विभागात रोजंदारीवर कार्यरत असलेल्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोग्रस येथून मुक्कामी मोर्चास सुरूवात झाली असून मंगळवारी वडाळीभोईहून मोर्च्याने नाशिककडे प्रस्थान केले. 

दरम्यान आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी नाशिकचे सहा. उपायुक्त स्वतः न येता त्यांनी चर्चेसाठी संशोधन विभागाचे अधिकारी पाठवल्याने आंदोलन कर्त्यांचा उद्रेक वाढला. यावेळी घोषणाबाजी करण्यात येऊन जोपर्यंत लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यानी घेतला. वडाळीभोई येथील मुक्कामी मोर्चा मंगळवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिशेने निघाला.