Sun, Jul 05, 2020 11:29होमपेज › Nashik › धुळे : २४ तासात कोरोनाचा तिसरा बळी

धुळे : २४ तासात कोरोनाचा तिसरा बळी

Last Updated: May 31 2020 11:20AM

संग्रहित छायाचित्रधुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हयात गेल्या २४ तासात कोरोनाने तिघांचा बळी गेला असुन आतापर्यंत जिल्ह्यात १९ जणांना कोरोनाने आपले प्राण गमवावा लागला आहे. मयतांमधे दोघे धुळे शहरातील तर एक रुग्ण शिरपूरमधील आहे. जिल्हयातील धुळे शहर व शिरपूरमधे मोठया प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने धुळयात १ जुन रोजी जनता संचारबंदी लावण्यात आल्याचे जाहीर केले आहे. धुळे शहरातील ४९ कंटेनमेंट झोनमधे ही संचारबंदी सक्तीने पाळण्यात येणार असुन शिरपूरमधे देखिल संचारबंदी लावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी खा. डॉ. सुभाष भामरे, आ. डॉ. फारुख शाह, जिल्हाधिकारी संजय यादव, अपर पोलिस अधिक्षक डॉ. राजू भुजबळ, मनपा आयुक्त अजिज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे , तहसिलदार संजय शिंदे यांच्यासह व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

नाशकात दाट वस्तीत बिबट्याचा हल्ला (video)

धुळे जिल्हयात गेल्या २४ तासात कोरोनाचा कहर आणखी तिव्र झाल्याचे चित्र आहे. जिल्हयात गेल्या २४ तासात तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात काल सकाळी धुळे शहरातील तीन तर रात्रीउशीरा उशीरा पाच व शिरपूर मधील १४ जणांना या कोरोनाची लागण झाली आहे. तर या विषाणुने जिल्ह्यातुन आणखी तिघांचा बळी घेतला आहे. यात धुळे शहरातील २ तर शिरपूरमधील एकाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५६ बाधित आढळून आले असुन यात धुळे शहरात सर्वाधिक ९७ तर शिरपूरमधे ३७ बाधित आहेत. धुळे ग्रामीणमधे ३ तर साक्री तालुक्यात १० तर शिंदखेडा तालुक्यात ९ बाधित आढळून आले आहेत. धुळे शहरात सर्वाधित १० जणांचा बळी गेला असुन त्यापाठोपाठ शिरपूरमधुन ४ तसेच साक्री व शिंदखेडयातून प्रत्येकी दोन व धुळे ग्रामीणमधुन एकाचा असे जिल्हयातुन १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या जिल्ह्यातून आतापर्यंत ६७ जणांना घरी सोडण्यात आले असले तरीही धुळे व शिरपुरमधे बाधितांचे प्रमाण कमालीचे वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या पहाता प्रशासनाने धुळ्यात उद्या १ जुन रोजी जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

धुळे शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण पहाता संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नागरीकांनी प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन लावण्यात आलेल्या संचारबंदीत घराबाहेर पडु नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.