Fri, Sep 20, 2019 21:47होमपेज › Nashik › अल्पवयीन गतीमंद मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अल्पवयीन गतीमंद मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

Published On: Oct 27 2018 3:55PM | Last Updated: Oct 27 2018 3:55PMनाशिक : पुढारी ऑनलाईन

नॅबमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने गतीमंद मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून शुक्रवारी (दि.२६) राञी उशिरापर्यंत पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. गतीमंद मुलीने ब्रेल लिपीत सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातपूर येथे असलेल्या नॅबच्या मुख्यकार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने १४ वर्षीय गतीमंद मुलीसोबत तीन चार दिवसांपुर्वी चाळे केले. हे करतांना संताप अनावर झालेल्या विद्यार्थीनीने तिला अवगत असलेल्या ब्रेल लिपीत पोलिसांत तक्रार केली इतकेच नव्हे तर संशयीताने केलेल्या प्रकरणाबाबत संस्थाचालकास देखिल सांगितले. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता संस्थेचे काही पदाधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेवून 'त्या' विशेष मुलीच्या तक्रारीची दखल घेत त्या मुलीच्या म्हणण्यानुसार तक्रार नोंदवली. 

याप्रकरणी राञी साडे दहा वाजेपर्यंत जाब जबाव नोंदविण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी संशयीतास ताब्यात.घेतल्याने त्याच्या नातलगांनी पोलिस ठाण्यासमोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला माञ पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे हे करीत आहे.