Sat, Jul 04, 2020 17:26होमपेज › Nashik › 'मला कोरोना झालाय, पैसे दे नाहीतर'...

'मला कोरोना झालाय, पैसे दे नाहीतर'...

Last Updated: Jun 03 2020 2:25PM

संग्रहित छायाचित्रनाशिक : पुढारी वृत्तसेवा

मला कोरोना झाला असून पैसे दे नाहीतर तुझ्या अंगावर थुंकून तुलाही कोरोनाबाधित करीन अशी धमकी देत पेट्रोल पंपावर काम करणाऱ्याकडे खंडणीची एकाने मागणी केली. याची माहिती समजताच मुंबईनाका पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या दीपक सोपान नाडे (३२, रा. नागसेन नगर, वडाळानाका) यास अटक केली आहे.

28 हजार शेतकर्‍यांना बांधावर बियाणे

नाशिकसह मालेगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती आहे. अनेकजण खबरदारी घेत आहेत, तर काही याचा गैरफायदा घेत असल्याचे आढळून येत आहे. सोमवारी (दि.१) रात्री सव्वा नऊच्या सुमारास व्दारका परिसरात तुफैस अहमद शब्बीर (४५, रा. बडी दर्गाजवळ, भद्रकाली) हे पेट्रोलपंपावर काम करीत होते.

त्यावेळी संशयीत दीपक तेथे गेला व मी मालेगाव येथून आलो आहे. मला कोरोना झाला असून मला २ हजार रुपये दे, नाहीतर मी तुझ्या अंगावर थुंकून तुलादेखील कोरोनाबाधित करेन अशी धमकी दिली. तुफैस यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने त्यांना शिवीगाळ करीत हात पाय तोडण्याची धमकी दिली. हा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी दीपकला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.