Sat, Sep 21, 2019 06:34होमपेज › Nashik › भूसावळमध्ये गोळी लागून रेल्‍वे कर्मचारी जखमी

भूसावळमध्ये गोळी लागून रेल्‍वे कर्मचारी जखमी

Published On: Apr 10 2019 3:50PM | Last Updated: Apr 10 2019 3:19PM
जळगाव : प्रतिनिधी 

भुसावळ शहरातील रेल्वेच्या दहा बंगला भागात राहणारा  रेल्वे कर्मचारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्‍याच्यावर शस्‍त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये त्‍याला गोळी लागल्‍याचे समोर आले. ही घटना मंगळवारी रात्री उघड झाली असून, या कर्मचार्‍याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की त्याच्यावर गोळीबार झाला याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र यामागे आनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

त्याच्याजवळ कट्टा आला कोठून? रेल्वे कर्मचाऱ्याला पिस्तुलची खरीच गरज आहे का? ते  इतके असुरक्षित आहे का की त्यांना रेल्वे कॉलनी मध्ये शस्त्र बाळगावे लागत आहे. यामागील नेमके कारण काय? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.  

भुसावळ शहरातील अनेकजण रेल्वे कर्मचारी आहेत. त्यांना राहण्यासाठी कॉलनी व बंगले आहेत. अशापैकीच  रेल्वेच्या दहा बंगला भागातील रहिवासी तथा रेल्वेत  इलेट्रिकल विभागात काम करणारा कर्मचारी असलेला याकूब जॉर्ज (वय 36) हे सोमवारी रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसले.  त्यांला मंगळवारी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. या शस्‍त्रक्रियेमध्ये याकूबच्या  डोक्यातून गोळी काढण्यात आल्‍याचे वैद्यकीय सूत्रांनी पोलिसांना सांगितले. शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व कर्मचार्‍यांनी मंगळवारी रात्री 10.45 वाजता जॉर्ज यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. यामध्ये पोलिसांना गोळीची रीकामी पुंगळी सापडली आहे.

घटनेचे कारण  गुलदस्त्यात !

दरम्यान, जखमी जॉर्ज हे त्यांच्या पत्नीपासून गेल्या चार वर्षापासून विभक्त राहत असून, पत्नी पुण्यात वास्तव्यास आहे. गोळीबारानंतर जॉर्ज हे एकटेच घरात होते. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून स्वतःवर गोळीबार केला की अन्य कुणी त्यांच्यावर गोळी चालवली? या बाबी पोलिस तपासात व जॉर्ज यांच्या जवाबानंतर निष्पन्न होणार आहेत.

याबाबत  डी वाय एस पी गजानन राठोड याच्याशी संपर्क साधला असता,  ते म्हणाले की या घटनेबाबत आधिक तपास सुरू आहे.  याप्रकरणात अजून काहीच निष्पण झाले नाही. तो कट्टा गावठी होता की अजून कोणती पिस्तूल होती हे निष्पण होने बाकी आहे. त्याची शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र तो अजून पूर्णपणे शुद्धीमध्ये आलेला नाही अशी माहिती त्‍यांनी दिली आहे.