Sun, Apr 21, 2019 06:39होमपेज › Nashik › विनयभंग प्रकरणी पोलिस शिपायाला अटक

विनयभंग प्रकरणी पोलिस शिपायाला अटक

Published On: Nov 09 2018 1:18PM | Last Updated: Nov 09 2018 11:23AMनंदुरबार : पुढारी ऑनलाईन 

सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणायाठी पोलिस हे 'सद्रक्षणाय- खल निग्रहणाय' या  ब्रीद वाक्याप्रमाणे आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र नंदुरबार जिल्ह्यात या ब्रीद वाक्याता काळीमा फारणारे काम पोलीस शिपायानेच केले. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे चक्क पोलीस शिपायानेच महिलेचा विनयभंग केल्याने त्याला अटक करण्याची नामुष्की पोलिसांवर आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवार दिनांक  ७ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता दुकान बंद करत असताना पोलीस शिपाई हारसिंग पावरा हा दारूच्या नशेत  तेथे आला आणि त्याने तिचा विनयभंग केला. या महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर उपविभागीय अधिकारी पी टी सपकाळे यांनी स्वतःघटनास्थळी जाऊन चौकशी केली असता खात्री झाल्यावर त्यांनी लगेचच अटकेची कारवाई केली.