Wed, Jun 26, 2019 01:54होमपेज › Nashik › नाशिक : रामकुंडाजवळ बुडून एकाचा मृत्यू

नाशिक : रामकुंडाजवळ बुडून एकाचा मृत्यू

Published On: May 08 2019 1:53PM | Last Updated: May 08 2019 1:53PM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिकमधील रामकुंडाजवळ पोहायला गेलेल्या तरुणाचा आज सकाळी बुडून मृत्यू झाला. या तरूणांचे नाव लक्ष्मण मीना (रा. शिर्डी, वय १८ वर्ष) असे आहे. 

वैजापूरसाठी आवर्तन सोडल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या दरम्यान रामकुंडाला लागून असणाऱ्या गांधी तलावात लक्ष्मण पोहायला गेला होता. त्यानंतर लक्ष्मणला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात बुडून मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी स्थानिक जलतरणपटूच्या मदतीने मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.